नागपूर: राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात प्रतिबंध आणखी कडक करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवार, २२ फेब्रुवारीला केली. सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीनंतर डॉ. राऊत यांनी निर्बंध कठोर करत असल्याचे सांगितले.

करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यानं प्रशासनानं कठोर पावलं उचलतं निर्बंध अधिक कठोर केले आहेत. विदर्भातील आमरावती, नागपूर, यवतमाळमध्ये करोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. नागपुरातील सर्व शाळा, महाविद्यालये कोचिंग क्लास ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाचाः

आठवडीबाजार, मंगल कार्यालय, हॉल, लॉन, रिसॉर्ट यावरही निर्बंध कठोर करत ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवार, रविवार बाजारपेठ व आठवडीबाजार बंद असतील, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये केवळ ५० टक्के क्षमतेने लोकांना प्रवेश असले, असे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.

वाचाः

करोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. करोना केअर सेंटर अधिक क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या भागांमध्ये कंटेन्मेट झोन तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विभागीय महसूल आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आदी उपस्थित होते.

वाचाः

काय सुरु? काय बंद राहणार

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली “मी जबाबदार” मोहीम शहरात व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार.

करोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दिनांक ७ मार्चपर्यंत बंद ठेवणार.

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा -वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, औषध पेट्रोल पंप वगळून) बंद ठेवणार.

आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार दिनांक ७ मार्चपर्यंत बंद ठेवणार.

जिल्ह्यातील हॉटेल (रेस्टॉरंटस्) ५० टक्के क्षमतेने रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी.

लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम दिनांक ७ मार्चपर्यंत बंद.

परंतु मंगलकार्यालय/ लॉन्स/रिसॉर्ट दिनांक २५ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत बंद राहतील.

कोरोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आएलटी तसेच सारीची तपासणी करणार.

कन्टेन्मेंट झोन तयार करणार

शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रोकन्टेन्मेंट झोन तयार करुन सक्तीने उपाययोजना.

हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित.

मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई.

नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी .

शासकीय आणि खासगी प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासणी.

त्रिसूत्रीचे पालन अनिवार्य.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here