मुंबई: राज्यात करोनाच्या साथरोगानं पुन्हा उचल खाल्ली असून सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. खुद्द आरोग्यमंत्री हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळं तेही चिंतेत आहेत. टोपे यांनी रुग्णालयातूनच राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं असून कळकळीचं आवाहन केलं आहे.

राजेश टोपे यांनी पत्रात लिहलं आहे की, ‘गेल्या वर्षभरापासून आपण करोना विरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोना योध्ये विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळं आपण करोना नियंत्रित करु शकलो,’ असं म्हणत राजेश टोपे यांनी करोना योध्यांचं कौतुक केलं आहे.

वाचाः

‘करोना योध्यांचे कौतुक करतानाच आरोग्यमंत्र्यांनी पुढील करोना संकटाबद्दलही नागरिकांना आवाहन केलं आहे. अद्याप करोना गेला नाहीये. तो पुन्हा डोकं वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामुहि लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या रुग्णालयात करोनाविरुद्ध लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून करोना विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो, कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या, परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सदभावना,प्रेम यामुळे त्याला हरवून पुन्हा एकदा कोरोना विरुध्दच्या सामुहिक लढाईत सहभागी होणार आहे,’ अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

वाचाः

‘समजदार, संवेदनशिल व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे . म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला.मात्र आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही.लॉकडाऊन टाळण केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क,सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा,’ असं भावनिक आवाहन यावेळी राजेश टोपे यांनी दिली आहे. एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने करोनाला हरवूया, असंही त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here