मुंबईः शिवजयंतीवरुन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजपनं काँग्रेसवर शिवरायांचा खोटा इतिहास टाकल्याचा दावा केला होता. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपचा हा दावा खोडून काढत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होतंय यात शिवरायांची कन्या सकवारबाई यांच्याबाबत एक छोटी गोष्ट सांगितली होती. तर, भाजपनं या ट्वीटवरुन सचिन सावंत यांना कोंडीत पकडत महाराणी सकवारबाई या शिवरायांच्या पत्नी व सखुबाई या कन्या आहेत, असं म्हणत सचिन सावंत यांच्यावर टीका केली होती. सचिन सावंत यांनीही भाजपवर पलटवार करत इतिहासाचा दाखला दिला आहे.

सचिन सावंत यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘भाजपचा तोंड फोडणारा हा पुरावा पाहा. सकवारबाई या महाराजांच्या कन्या होत्या व एका पत्नीचे नाव ही तेच होते. भाजपने शिवरायांचा अपमान केला, माझी बदनामी केली. अकलेचे तारे तोडल्याबद्दल भाजपने तात्काळ माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. तर, शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसंच, ‘एका पुस्तकाचा फोटोही त्यांनी जोडला आहे. शिवाजी महाराजांच्या एका पत्नीचे नावही सखवारबाई होते,’ असा उल्लेख यात केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here