जीनिव्हा: कोव्हिड प्रतिबंधक लस जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करण्याच्या आणि जागतिक पातळीवर कोव्हिडविरुद्ध लढ्याचे नेतृत्व केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुट्रेस यांनी भारताचे कौतुक केले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेसाठी भारताने करोना प्रतिबंधक दोन लाख डोस पुरविले आहेत. त्याबद्दल गुट्रेस यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून आभार व्यक्त केले आहेत. त्यांचे पत्र भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी ट‌्वीट केले आहे. ‘करोनाचा मुकाबला करण्याच्या लढ्यात भारत हा जागतिक नेता आहे. भारताने कोव्हिड काळात सुमारे १५० देशांना औषधे, तपासणी साहित्य, व्हेंटिलेटर्स आणि पीपीई कीटचा पुरवठा केला आहे. करोना प्रतिबंधक दोन लशी भारताने विकसित केल्या आहेत आणि त्यांचे उत्पादनही केले आहे. या दोन्ही लशींना जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरयोग्य म्हटले आहे. त्याचा पुरवठाही जागतिक बाजारपेठेत सुरू आहे. अधिकाधिक देशांना लस मि‌ळ‌ावी यासाठी संघटनेच्या कोव्हॅक्स मोहिमेलाही भारताने सातत्याने पाठिंबा दिला आहे,’ असे या पत्रात गुट्रेस यांनी नमूद केले आहे.

वाचा:

वाचा:

शांतिसैनिक ज्या कठीण प्रसंगात काम करीत असतात त्याचा विचार करून भारत या सैनिकांसाठी करोना प्रतिबंधक दोन लाख डोस देणार असल्याचे ट‌्वीट परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बुधवारी केले होते. या लशीचे दोन डोस सैनिकांना देण्यात येणार आहेत. सध्या जगात ९४ हजार ४८४ शांतिसैनिक असून, १२ मोहिमा सुरू आहेत. या सैनिकांना पुरेसे होतील एवढे डोस भारताने दिले आहेत.

वाचा:
दरम्यान, करोनाच्या थैमानाने हतबल झालेल्या जगाला दिलासा देणारी बातमी इस्रायलने दिली आहे. इस्रायलमध्ये
मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या लसीकरणामुळे करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवले असल्याचे चित्र आहे. फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस इस्रायलमध्ये लसीकरणासाठी वापरली जात आहे. ही लस प्रभावी ठरली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here