राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असताना काही जिल्ह्यांत पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल जनतेसोबत संवाद साधताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला कळकळीची विनंती केली आहे.
वाचाः
‘राज्यात पुन्हा करोनानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळं कार्यक्रम हे साधेपणानं घ्यावे लागत आहेत. लॉकडाऊन पुन्हा लागू होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कठोर निर्णय घेण्याची वेळ कृपा करुन आणू नका,’ असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
‘लॉकडाऊनमुळं संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी बिघडते. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एवढी बिकट अवस्था होतेय, हे आपण पाहिलंय. लॉकडाऊनची वेळ येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे,’ असंही अजित पवार म्हणाले.
वाचाः
‘राज्याच्या प्रमुखांनी कालच जनतेला सांगायचा प्रयत्न केला आहे. काय काळजी घ्यायची ते. पण तरीही लोकांचं करोनाबद्दलचं गांभीर्य निघून गेलंय. यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये कठोर निर्णय घ्यावे लागले, पुण्यातही थोडी कडक भूमिका घ्यावी लागली,’ असं अजित पवार म्हणाले.
वाचाः
‘आजचा हा कार्यक्रम रायगडसाठी महत्त्वाचा आहे. ४०० कोटीपेक्षा जास्त खर्च नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजनेसाठी केला जातोय. भविष्यात पाण्यासाठी युद्ध होणार आहेत. अनेक राज्यात पाण्याचे वाद झाले आहेत हे वाद गावागावात पोहेचले. लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे,’ असंही अजित पवार म्हणाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times