नवी दिल्लीः शेतकऱ्यांच्या ( ) ट्रॅक्टर मोर्चात २६ जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसाचार ( ) प्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी जसप्रीत सिंग ( ) याला अटक केली. हिंसाचाराच्या वेळी लाल किल्ल्याच्या घुमटावर चढल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यावेळी त्याने सळई उचललेली होती.

२६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्चापासून १६ शेतकरी बेपत्ता

२६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झालेले १६ शेतकरी बेपत्ता असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला होता. मात्र, हिसांचार करणाऱ्या १२२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.

भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये झडप

मुझफ्फरनगरमध्ये भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्यात संघर्ष झाला आहे. राष्ट्रीय लोक दलाचे उपाध्यक्ष जयंत चौधरी यांनी या घटनेचे फोटो शेअर केले आहेत. अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या मागणी मान्य करत नाही किमान त्यांचा आदर करावा, असं त्यांनी म्हटलंय.

मुझफ्फरनगरमधील शोराम या गावात भाजपचे मंत्री संजीव बलियान यांचे समर्थक आणि ग्रामस्थांमध्ये झडप झाली. बलियान यांची समर्थकांवर हल्ल्याचा आरोप आहे. तेराव्याच्या कार्यक्रमासाठी बालियन हे एका कार्यक्रमात पोहोचले. त्यावेळी जय जवान-जय किसान आणि भाजपविरोधी घोषणाबाजी होऊ लागली. यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि मारहाण झाली. यात अनेक जण जखमी झाले.

भाजपच्या खासदारसोबत आलेल्या तरुणांनी गावातील युवकांना लाठ्यांनी मारहाण केली. आपला जीव वाचवून युवक घरात घुसले. पण त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. महिलांशी असभ्स वर्तन केले, असा आरोप गावकऱ्यांनी केला.

ग्रामस्थांचा पोलिस ठाण्याला घेराव

या घटनेनंतर गावकऱ्यांनी विरोध केला आणि ते शाहपूर पोलिस ठाण्यात पोहोचले. बलियान आणि त्यांच्या समर्थकांच्या अटकेची मागणी त्यांनी केली. यावेळी आरएलडीचे शेकडो समर्थक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दुसरीकडे, केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात २३ ते २७ फेब्रुवारी यादरम्यान आंदोलन करणारे शेतकरी अनेक कार्यक्रम घेणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here