भारताच्या संघात आता आपल्याला संधी मिळणार नाही, हे या खेळाडूला पक्के माहिती आहे. त्यामुळे आता या खेळाडूने आपला मोर्चा कॉमेंट्रीकडे वळवल्याचे पाहायला मिळत आहे. या भारताच्या खेळाडूबरोबर यावेळी इंग्लंडचेही काही आजी-माजी खेळाडू कॉमेंट्री करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. १२ मार्चपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.
भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने आता कॉमेंट्री करण्याचे ठरवले आहे. दिनेश एका विदेशातील चॅनेलसाठी इंग्रजीमध्ये कॉमेंट्री करणार आहे. दिनेशबरोबर यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडही कॉमेंट्री करणार आहे. त्याचबरोबर नासिर हुसेन, माइक आर्थटन, इयान वॉर्ड, डेव्हिड लॉइड हेदेखील या कॉमेंट्री टीममध्ये सहभागी असतील. दिनेश पहिल्यांदाच यावेळी कॉमेंट्री करणार आहे. यापूर्वी दिनेश एक ्क्रिकेटपटू म्हणून सर्वांनाच परिचित आहे. पण आता त्याची एक नवीन इनिंग सुरु होणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका पुण्यात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी ज्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्या सर्व खेळाडूंना बीसीसीआयने संघात दाखल होण्यासाठी १ मार्चपर्यंतचा कालावधी दिला आहे. जे भारतीय खेळाडू कसोटी संघाबरोबर नाहीत त्यांना १ मार्चपर्यंत अहमदाबाद येथे पोहोचायचे आहे. त्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. या क्वारंटाइनच्या कालावधीत त्यांची करोना चाचणीही होऊ शकते. या चाचणीचा निकाल निगेटीव्ह आल्यावर त्यांना खेळाडूंबरोबर सराव करता येऊ शकतो. पण त्यासाठी त्यांना १ मार्चपर्यंत आपल्या संघात दाखल व्हायचे आहे. अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर हे सामने रंगणार आहेत. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका पुण्यामध्ये खेळवण्यात येणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times