जळगाव: जिल्ह्यातील करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी यांनी आजपासूनच रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत जाहीर केली आहे. जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेस बंद ठेवतानाच सार्वजनीक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. ( )

वाचा:
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून कडक कारवाईचे निर्देश दिले. यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. अर्थात या सात तासांमध्ये कुणीही रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर नियमानुसार कडक कारवाई होणार आहे. जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेस बंद करण्याचे आदेश देखील जारी करण्यात आले आहेत.

वाचा:

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले आहेत. ऑनलाइन शिक्षणाची सुविधा देता येईल. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शैक्षणिक कामांकरिता शाळा/महाविद्यालयात उपस्थित राहू शकतात. अभ्यासिका केवळ ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरु ठेवता येतील. सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, दिंडी धार्मिक कार्यक्रमांना बंदी असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ १० लोकांच्या उपस्थितीत पूजा-अर्चा सारख्या विधीकरीता खुली राहतील. सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक व तत्सम कार्यक्रम यांना बंदी राहील. तसेच सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने यांना बंदी राहील. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद असतील. वैधानिक सभांत केवळ ५० लोकांच्या उपस्थितीस परवानगी असेल. जिल्हा परिषद सर्व साधारण सभा व जळगाव शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या मर्यादेतून सुट असेल. संचारबंदीमध्ये बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ऑटोरिक्षा यांना मुभा राहील. मात्र ऑटोरिक्षामधून चालक वगळता केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करता येईल. तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक व संबंधित आस्थापना उदा. पेट्रोलपंप, गॅरेजेस यांना देखील सूट राहील. निदर्शने, मोर्चे, रॅली यांना बंदी राहील. केवळ ५ लोकांच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here