मंत्र्यांचा विरोध करण्यास सुरवात झाल्यानंतर वाद सुरू झाला आणि वातावरण बिघडलं. भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील शाहपूर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे. ज्यांच्याशी झडप झाली ते मंत्री बलियान यांचे समर्थक होते, असा पीडितांचा आरोप आहे.
शेतकऱ्यांनी बोलावली महापंचायत
या घटनेनंतर राष्ट्रीय लोकदल आणि शेतकर्यांच्या वतीने महापंचायत झाली. दुसरीकडे, भाजप नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची तयारी शेतकर्यांकडून सुरू आहे. या घटनेवरून राष्ट्रीय लोक दलाने भाजप मनोवृत्तीवर टीका केली आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना ही घटना घडल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे. पश्चिम यूपीमधील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या वतीने महापंचायत आयोजित केली जात आहे.
आएलडीचे नेते जयंत चौधरी म्हणाले…
शेतकऱ्यांच्या सभेत आरएलडी नेते जयंत चौधरी यांनी भाजपवर निशाणा साधला. चौधरी यांनी यासंबंधी ट्वीट केलं आहे. ‘सोरम गावात भाजप नेते आणि शेतकरी यांच्यात संघर्ष, अनेक जण जखमी! शेतकर्यांच्या बाजूने काही विचार करत नाही पण किमान त्यांचा आदर तर ठेवा. कृषी कायद्यांचे फायदे सांगायला निघालेल्या सरकारच्या प्रतिनिधींची गुंडगिरी गावकरी सहन करतील का?, असं ते ट्वीटमध्ये म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times