मुंबई: यांचा ठाण्यातील निष्ठावान शिलेदार अशी ओळख असलेले माजी महापौर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री यांनी तीव्र शोक व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनंत तरे यांच्या निधनाने शिवसेना कुटुंबातील एक तारा आज निखळला, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. ( )

वाचा:

अनंत तरे यांच्या निधनाने मुख्यमंत्री भावुक झाले. त्यांनी नेमक्या शब्दांत अनेक तरे यांच्यातील सच्चा शिवसैनिक उलगडून सांगितला. ‘ठाण्याचे शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक अनंत तरे गेले. अखेर कोविडने आपल्यातून हिरावून नेला. अनंत तरे म्हणजे ठाण्यातला सच्चा कार्यकर्त्ता. शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी द्यायची आणि अनंत तरे यानी ती निभावायची आणि त्यांना सर्व कोळी समाजातील बांधवांनी, शिवसैनिकांनी साथ द्यायची हे जणू ठरलेले समीकरणच. ठाण्याचे महापौरपद असो, एकवीरा देवस्थानचे अध्यक्षपद असो, लोकसभा निवडणुकीत मिळालेली उमेदवारी असो की ठाण्यातील संघटनेचे कोणतेही काम असो; अनंत तरे कधीच कुठे कसर सोडली नाही. एका निष्ठेने ते वागले. शिवसेनेचा हा निष्ठावान कार्यकर्ता आज अनंतात विलीन झाला आणि खरेच तारा म्हणून आकाशगंगेत सामावला. अनंता आता तुला कोण पाहू शकणार नाही पण तुझी स्मृती कायम आम्हा शिवसैनिकांच्या स्मरणात राहील, खरंच अनंत तरे यांच्या निधनाने शिवसेना कुटुंबातील एक तारा निखळला आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन’, अशा शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

वाचा:

एक संघर्ष करणारा हरहुन्नरी नेता गमावला: महापौर म्हस्के
अनंत तरे यांच्या निधनाने एक लढवय्या, संघर्ष करणारा सैनिक, नेता आम्ही गमावला आहे, अशा भावना ठाण्याचे महापौर यांनी व्यक्त केल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून तरे यांची विशेष ओळख होती. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीमध्ये ठाणे शहराचा विकास आराखडा आखण्यात आला. विरोधकांकडून महापौरपद खेचून आणून महापौरपदाची हॅट्ट्रिक करणारे महापौर म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती. अत्यंत अभ्यासपूर्ण असे त्यांचे वक्तृत्व होते. महापौर म्हणून काम करत असताना त्यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना बरोबर घेवून ठाण्याचा विकास केला. संघटनेच्या माध्यमातून त्यांच्यावर शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती व ते काही काळ विधानपरिषदेचे आमदार म्हणून कार्यरत होते. रायगडमधून लोकसभेची निवडणूक देखील त्यांनी लढविली होती, त्यात त्यांना काही मतांनी पराभव पत्करावा लागला होता, पण या पराभवाने खचून न जाता ते शिवसैनिक म्हणून काम करीत राहिले. राजकारण व समाजकार्याबरोबरच धार्मिक कार्यातही ते सक्रिय होते. तळागाळातील गरीब व गरजू लोकांच्या समस्या जाणून घेवून त्यांना ते सढळ हस्ते मदत करीत होते. दानशूर व्यक्तिमत्व अशी देखील जनमानसात त्यांची ख्याती होती. नवोदित शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन करुन वेळप्रसंगी त्यांना आर्थिक आधारही दिला. मुंबई, ठाणे या परिरातील मूळ रहिवाशी असलेल्या कोळी समाजाला राजकीय पटलावर एकत्र करून कोळी समाजाची एकसंघ मोठी ताकद शिवसेनेशी जोडण्याचे काम अनंत तरे यांनी केले. मलाही त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अनेक निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्याबरोबरच रायगडमध्येही मी त्यांच्याबरोबर काम केले. सर्वांना एकत्र करण्याचे त्यांचे कौशल्य मला जवळून अनुभवता आले. त्यांच्या निधनाने तयार झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या निधनाने समाजाचे, ठाणे शहराचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना म्हस्के यांनी व्यक्त केल्या.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here