बडौतत शहरातील आझाद मार्केटमध्ये हरेंद्र आणि आशुचे चॅटचे दुकान आहे. एका ग्राहकावरून सोमवारी दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली आणि बघता बघता हा वाद विकोपाला. दोन्ही बाजूचे चॅट विक्रेते लाठ्याकाठ्या आणि लोखंडी सळ्यांनी मारहाण सुरू केली. यामुळे बाजारात एकच गोंधळ उडाला. लोकांनी दुकानात घुसून आपला जीव वाचवला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि १२ हून अधिक जणांना ताब्यात घेतले. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या भांडणात एका बाजूला हरेंद्र, त्याचा भाऊ पूर्णमासी, मुलगा धनजित आणि अनिल होते. तर दुसर्या बाजूचे आशु, विक्की, नरेंद्र आणि अमित हे जखमी झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रर केली. कारवाईची मागणी केली. पोलिसांनी १० हून अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्यात वृत्तपत्रातील एक फोटोग्राफरही जखमी झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं सीओ आलोक सिंह यांचं म्हणणं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times