म. टा. प्रतिनिधी, सांगलीः तडवळे (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ( ) ऊसतोड मजुराच्या अकरा महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सोमवारी (ता. २२) दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पुन्हा एकदा शिराळा तालुक्यात ( ) बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

तडवळे येथे जाईच्या विहिरीजवळ बंडा शामराव पाटील यांच्या शेतात ऊस तोड चालू होती. ऊस तोडण्यासाठी बीड जिल्ह्यातील ऊस तोड मजूर आले होते. एका मजूर दाम्पत्याने बाजूला असणाऱ्या झाडाच्या सावलीत अकरा महिन्याच्या बालकाला झोपवले होते. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने बाजूलाच असणाऱ्या ओढ्याच्या दिशेने येऊन बाळाच्या दिशेने झेप घेतली. त्याला जबड्यात पकडून बिबट्या पळून जाऊ लागला. हा प्रकार मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. यानंतर बिबट्याने बाळाला टाकून पलायन केले. ताबडतोब त्या जखमी बाळास उचरासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

गेल्या दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने लहान मुलांवर हल्ला केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here