वाचा:
लक्ष्मी लॉन्स येथे पार पडलेला धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. विवाह सोहळ्यासाठी आधीच अनेक नियम निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यात १०० जणांच्या उपस्थितीत विवाह पार पाडावा, असे आदेश आधीपासूनच देण्यात आलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने हे निर्बंध अधिकच कठोर करण्यात आलेले आहेत. शिवाय पुणे जिल्ह्यासाठी आणखीही प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महाडिक यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग, वऱ्हाडींची संख्या यासह अनेक नियम मोडले गेल्याने पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले आहे. महाडिक यांच्या मुलाच्या लग्नाला हजार ते बाराशे वऱ्हाडी उपस्थित होते. या शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले नाहीत. त्याच आधारावर पोलिसांनी विविध कलमांतर्गत महाडिक यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर यांचाही समावेश आहे.
वाचा:
शरद पवार, यांची उपस्थिती
पृथ्वीराज आणि वैष्णवी यांच्या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा , राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे उपमुख्यमंत्री दृष्यंत चौटाला, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. याशिवाय पाहुणे मंडळीचाही मोठा गोतावळा लग्नाला उपस्थित होता. या गर्दीमुळेच धनंजय महाडिक अडचणीत आले आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times