गुरुग्राम: कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर हरयाणात चर्चेसाठी भाजपची बैठक बोलावण्यात आली होती. भाजपच्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी वस्तूस्थिती मांडत नेत्यांना थेट प्रश्न विचारले. पण या बैठकीतून समोर आलेल्या एका व्हिडिओने पक्षाती नाचक्की झाली आहे.

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक भाजप कार्यकर्ता पक्ष पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारतोय. ‘कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी आपलं म्हणणं ऐकण्यास तयार नाहीत, ते कृषी कायद्याच्या समर्थनार्थ ते काहीही बोलण्यास तयार नाहीत. यामुळे त्यांना भ्रमित करावं लागेल’, असं हा कार्यकर्ता म्हणतोय. गुरुग्राम येथे झालेल्या या बैठकीत हरयाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओपी धनखड, क्रीडामंत्री संदीप सिंह आणि हिसारचे खासदार ब्रिजेंद्र सिंहही उपस्थित होते. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.

भाजपचे कार्यकर्ते पक्षातील नेते आणि मंत्र्यांची भेट घेत आहेत आणि शेतकऱ्यांना भ्रमित कसं करायचं? असं विचारत आहेत. शेतकरी आपलं म्हणणं मान्य करण्यास तयार नाहीत, असं हे कार्यकर्ते स्पष्टपणे सांगत आहेत. हाच भाजपचा खरा चेहरा आहे जो शेतकऱ्यांच्या समोर येत नाही, अशी टीका सुरजेवाला यांनी केली.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबरपासून करत आहेत. हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. भाजपच्या नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीनंतर हरयाणा, पश्चिम यूपीतील नेत्यांना शेतकरी नेते, खाप चौधरी यांची भेट घेऊन त्यांना कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, शेतकरी नेत्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या भाजपच्या नेत्यांना स्थानिकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. हे तिन्ही मागे घेण्याच्या मागणीसह एमएसपीवर कायदा करण्याच्या हमीशिवाय काहीही ऐकण्यास तयार नाहीत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here