वाचा:
खटुआ समितीच्या शिफारशीनुसार मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि (काळी पिवळी) भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता रिक्षासाठी १८ ऐवजी किमान २१ रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे व त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये २० पैसे मोजावे लागणार आहेत. टॅक्सीसाठी आता २२ रुपयांऐवजी किमान भाडे २५ रुपये इतके असेल. पहिल्या टप्प्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १६ रुपये मोजावे लागतील, असे परब यांनी नमूद केले.
वाचा:
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची अंमलबजावणी येत्या १ मार्चपासून करण्यात येणार आहे. १ मार्च ते ३१ मे पर्यंत कार्डनुसार भाडं आकारता येणार असून ३१ मे पर्यंत मीटर कॅलिबरेशन पूर्ण झाले पाहिजे, असे सांगण्यात आल्याचेही परब यांनी नमूद केले. गेल्या सहा वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ झालेली नव्हती. ही बाब ध्यानात घेऊन समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ करण्यात आली आहे, असेही परब यांनी स्पष्ट केले.
वाचा:
दरम्यान, रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ झाल्याने मुंबई तसे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरवासीयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्याचवेळी रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांसाठी मात्र ही दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा-टॅक्सी युनियनकडून ही मागणी करण्यात येत होती. ही मागणी सरकारला अखेर मान्य करावी लागली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times