मुंबई: राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने प्रमुख शहरांत निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी दैनंदिन रुग्णसंख्या सात हजाराच्या घरात पोहचली होती. हा आकडा आज पाच हजारावर आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे ५ हजार २१० नवीन रुग्ण आढळले असून त्याचवेळी ५ हजार ३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मृत्यूंचे प्रमाणही आज कमी झाले आहे. लॉकडाऊनचे संकट घोंगावत असताना ही आकडेवारी दिलासा देणारी ठरली आहे. ( )

वाचा:

करोनाचा धोका वाढत असल्याने मुख्यमंत्री यांनी रविवारी राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील करोनाची सद्यस्थिती समोर ठेवली. काही भागांत होणारी रुग्णवाढ किती धोकादायक आहे, हे आकडेवारीनिशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. करोनाचे नियम पाळा. विनाकारण घराबाहेर पडू नका. विनामास्क फिरू नका. पाळा, अशी वारंवार विनंती करतानाच नको असेल तर पाळावेच लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. त्याचवेळी सार्वजनिक, राजकीय आणि सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांनाही मुख्यमंत्र्यांनी मनाई केली. दरम्यान, दुसरीकडे प्रशासनस्तरावरही निमयांची काटेकोरपणे अंमलबजावणी आधीपासूनच सुरू करण्यात आली आहे. या सर्वाचा परिपाक म्हणून राज्यात रुग्णसंख्या पुन्हा एकदा कमी होताना दिसू लागली आहे.

वाचा:
आजची आकडेवारी पाहिल्यास नवीन रुग्णांची संख्या तसेच मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे तर करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात आज १८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.४६ टक्के एवढा आहे. आज राज्यात ५ हजार २१० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ५ हजार ३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १९ लाख ९९ हजार ९८२ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६ टक्के एवढे झाले आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५७ लाख ९३ हजार ४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ६ हजार ९४ (१३.३४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २४ हजार ५४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली ५३ हजारांवर

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आज ५३ हजार ११३ इतकी झाली असून सर्वाधिक ९ हजार ८७४ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात हा आकडा ७ हजार १६७ इतका झाला आहे तर ठाणे जिल्ह्यात ६ हजार १४८ आणि मुंबईत ५ हजार ९८६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. करोनाचा नवा हॉटस्पॉट ठरलेल्या अमरावती जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ४०४ इतकी झाली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here