म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मॉडेल-अभिनेत्री शर्लिन चोप्राने तिचे ऑनलाइन सहज उपलब्ध होतील अशाप्रकारे पसरवले, अशा आरोपाच्या एफआयआर प्रकरणात शर्लिनला आणखी एक आठवड्यासाठी अटकेच्या कारवाईपासून दिलासा कायम राहिला आहे. शर्लिनने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सविस्तर सुनावणी होऊ न शकल्याने न्या. प्रकाश नाईक यांनी सुनावणी पुढील सोमवारी ठेवली. त्यामुळे अटकेसारखी कठोर कारवाई करणार नसल्याची हमी पोलिसांनीही तोपर्यंत कायम ठेवली.

वाचा:

‘मी इंग्लंडमधील एका कंपनीकरिता स्वामित्व हक्क असलेल्या व्हिडीओंची निर्मिती प्रौढ प्रेक्षकांसाठी करते. विशिष्ट शुल्क भरणाऱ्यांनाच ते पहायला मिळतात. मात्र, कोणीतरी घुसखोरी करत हे व्हिडीओ मिळवून परस्पर ऑनलाइन अपलोड केले आहेत. हे मी केलेले नसून याविषयी माझीच मूळात तक्रार आहे. मीच याविषयी सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे. मी पीडित असूनही पोलिसांनी माझ्याचविरोधात नोंदवलेला एफआयआर चुकीचा आहे’, असे म्हणणे शर्लिनने अॅड. चरणजीत चंदरपॉल यांच्यामार्फत केलेल्या अर्जात मांडले आहे. सोमवारी पोलिसांतर्फे सरकारी वकील अनामिका मल्होत्रा यांनी प्राथमिक म्हणणे मांडले. मात्र, वेळेअभावी सविस्तर सुनावणी होऊ शकली नाही.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here