सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यामुळे वादात सापडलेले व गेले अनेक दिवस नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री आज अखेर अवतरणार आहेत. ( To Visit Pohradevi Temple)
लाइव्ह अपडेट्स:
>> संजय राठोड काही वेळातच पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघणार असल्याची माहिती
>> संजय राठोड मीडियाशी बोलणार का याबद्दल उत्सुकता
>> पोहरादेवी दर्शनानंतर संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन करोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेणार
>> पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. बॉम्बशोधक पथकही तैनात
>> संजय राठोड साडेअकरा वाजता मंदिरात येऊन दर्शन घेणार असल्याची माहिती
>> पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांचा उपस्थितीत होम हवनाचे आयोजन
>> संजय राठोड पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी येणार
>> पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आले आहे संजय राठोड यांचे नाव
>> गेले दोन आठवडे ‘नॉट रिचेबल’ असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज सर्वांसमोर येणार
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times