पुणे, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनानं कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर, रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर संपूर्ण राज्यात कठोर निर्णय घेण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. राज्यात करोना संसर्गाप्रमाणेच लॉकडाऊनच्या अफवांना उत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लॉकडाऊनच्या मेसेजवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
वाचाः
अनिल देशमुख यांनी एक ट्विट करत अफवा पसरवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. ‘महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,’ असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
वाचाः
दरम्यान, वाढता संसर्ग लक्षात घेता येत्या काही दिवस राज्यात गर्दी जमवणाऱ्या सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक अशा मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times