मुंबई- आणि नुकतच आपल्या दुसऱ्या मुलाला घेऊन घरी गेले. २१ फेब्रुवारी रोजी करिनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात सिझरिनद्वारे करिनाने दुसर्‍या मुलाला जन्म दिला. दोन दिवसांनंतर इस्पितळातून करिनाला डिस्चार्ज देण्यात आला. स्वतः सैफ अली खान त्यांना घरी नेण्यासाठी इस्पितळात गेला होता. यावेळी त्याच्यासोबत तैमुरही होता.

मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून काही फोटो समोर आले आहेत, यात सैफ आणि करिना गाडीत बसून घरी जाताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये तैमूर सैफच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. यापूर्वी फॅमिलीचे बरेच सदस्य आणि जवळचे मित्र करीना कपूरला पाहण्यासाठी रुग्णालयात आले होते.

दरम्यान, करिना आणि सैफने २०१२ मध्ये लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षानंतर करिनाने २०१६ मध्ये तैमूरला जन्म दिला. आता जवळपास चार वर्षांनंतर ती पुन्हा एकदा आई झाली. करिनाने दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी नवीन घर घेतलं. या घराचं इण्टेरिअरही दोन मुलांच्या गरजांप्रमाणे करण्यात आलं.

लॉकडाउनमध्ये करिनाने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. करिना आणि सैफने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, ‘आमच्या कुटुंबात नवीन पाहुणा येणार आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आर्शीवादासाठी खूप आभार.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here