मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते व वनमंत्री हे आज पंधरा दिवसांनंतर सर्वांसमोर आले आहेत. संजय राठोड आज सपत्नीक पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले आहे. संजय राठोड १५ दिवसांनंतर सर्वांसमोर आल्यानतंर भाजपनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवीच्या दर्शनासाठी संजय राठोड आज आले आहेत. यावेळी राठोड यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. तसंच, समर्थनार्थ घोषणाही दिल्या आहेत. भाजपचे नेते यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला.

पोहरादेवीची पूजा तरी कशी पावेल जर चव्हाणच्या पूजाच काय झालं ते सांगितलं नाहीत तर?, असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

युवतीच्या मृत्यूप्रकरणात नाव आलेले मंत्री १५ दिवस गायब होतात. मुख्यमंत्री गप्प. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासत हे मंत्री सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवत शक्ती प्रदर्शन करतात. सत्तेची अपरिहार्यता असू शकेल. मुख्यमंत्री किमान करोनाचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल तरी करणार का?, असंही उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here