मुंबईः पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी () राज्याचे वनमंत्री () यांनी खुलासा केल्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार () यांनी संजय राठोड आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राठोड यांना वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावरील केबिनमध्ये दडलंय काय?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे () यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

संजय राठोड यांनी आपली बाजू मांडल्यानंतर आशीष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी वनमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

राठोड आणि महाविकास आघाडी सरकावर टीकास्त्र सोडताना शेलार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राठोड यांचा जाहीर कार्यक्रम कसा काय होतो?, त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी कशी काय मिळते? त्यांच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असताना त्याची गुप्तवार्ता विभागाला माहिती होती की नाही?, असे सवाल शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

ज्या भगिनीच्या नावाने संशयाचं वातावरण तयार झाले आहे, ती भगिनीही त्याच समाजाची आहे. हे लक्षात घेता या प्रकरणाची चौकशी दडपण्यासाठी मोठे कारस्थान होत आहे, असा थेट आरोपही शेलार यांनी केला आहे. पोलिस यंत्रणेवर आतापर्यंत राजकीय दबाव होता. मात्र, आता आम्ही त्यांच्यावर सामाजिक दबाव टाकू असेच वनमंत्री संजय राठोड यांनी दाखवून दिले असल्याचे आरोपही शेलार यांनी केला आहे.

शेलारांचे मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आवाहन

हिंमत असेल तर पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाची चौकशी करून दाखवा असे आवाहन सतत सरकारला करण्यात येत आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणातील गुलदस्त्यात असलेल्या गोष्टी उघड करायला हव्यात, असेही शेलार म्हणाले. पोलिसांवर मोठा दबाव असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ते वारंवार स्पष्ट केले आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर संशय आहे ते राज्याचे एक मंत्री आहेत, याकडेही शेलार यांनी लक्ष वेधले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावरील केबिनमध्ये ‘दडलंय काय?’- शेलार

फोनवरील संभाषणात एका व्यक्तीचे नाव वारंवार येते. ती व्यक्ती उपलब्ध आहे की ती गायब आहे तेच कळायला मार्ग नाही, असे म्हणत या टोपीखाली दडलंय काय?… तसेच या मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावरील कॅबिनमध्ये दडलंय काय?, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here