पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले यांनी आज सपत्नीक पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. तिथं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आरोपांवर स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, संजय राठोड यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच पोहरा देवी गडावर मोठी गर्दी केली होती. तसंच, घरातून निघाल्यानंतर त्यांच्यासोबत मोठ्याप्रमाणात गाड्यांचा ताफादेखील होता. करोना संकटानं राज्यात पुन्हा उचल खाल्यानं मुख्यमंत्र्यांनी राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध आणल्यानंतर मंत्रिमंडळातील नेत्याकडूनच नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
वाचाः
आज राज्यातही कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, ‘गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.
वाचाः
‘मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे, असेही मुख्यमंत्री स्पष्ट केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times