‘बाबूचा ‘ (babucha vada) या ब्रॅण्डने देश-परदेशात प्रसिद्ध असलेले विलेपार्ले येथील वडापाव विक्रेते (baburao sitaprao) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. अंधेरीतील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ( who was famous for his brand babucha passed away)
रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली या गावातून ६० च्या दशकात वयाच्या बाराव्या वर्षी बाबुराव सीतापराव मुंबईत आले. सुरूवातीची काही वर्ष पार्ल्यातील जीवन हाॅटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. या हाॅटेलचे मालक जोगळेकर हे पार्ले टिळक शाळेतील कॅन्टीन चालवत असत. सीतापराव यांची मेहनती वृत्ती पाहून काही वर्षांनंतर जोगळेकर यांनी हे कॅन्टीन त्यांना चालवायला दिले. सुमारे चार दशकाहून अधिक काळ त्यांनी हे कॅन्टीन चालवले. मुठीत न मावणारा मोठ्या आकाराचा चविष्ट आणि चुरचुरीत वडा ही सीतापराव यांची ओळख बनली. बाबुचा वडा या नावाने ते कॅन्टीन काही वर्षांतच लोकप्रिय झाले.
पार्ले टिळक शाळेपाठोपाठ गेल्या काही वर्षांत त्यांनी ‘बाबुचा वडा’ या नावाने सुरूवातीला शाळेबाहेरील कोपर्यावर वडापावचा स्टाॅल सुरू केला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ‘बाबू’ या नावाने ओळखल्या जाणार्या सीतापराव यांनी पुढे पार्ल्यात दोन आणि अंधेरीत दोन दुकाने सुरू केली. वडापावसोबत सामोसा, मिसळसह इतर मराठी खाद्यपदार्थांची विक्री या दुकानांमध्ये केली जात असून त्याला खवय्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.
क्लिक करा आणि वाचा-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, स्मृती इराणी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उस्ताद झाकीर हुसेन, अभिनेते सुमीत राघवन, पुष्कर श्रोत्री, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘बाबुचा वडा’चे कौतुक केले आहे, अशी माहिती त्यांचा मुलगा विनेश सीतापराव यांनी दिली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times