नवी दिल्ली- गेल्या वर्षी कर्करोगावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. जवळपास ११ महिन्यांनी ते भारतात परतले. पण आता त्यांची तब्येत पुन्हा बिघडली असून त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अरमान जैनच्या मेहंदीला बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत कपूर कुटुंबिय उपस्थित होतं. यावेळी ऋषी आणि नीतू कपूर या सोहळ्याला उपस्थित नव्हते. एवढंच नाही तर रणबीर कपूर आणि आलिया भट्टही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही.

ऋषी यांना दिल्लीतील रुग्णालयात प्रकृती बिघडल्यामुळे भरती करण्यात आले. याबद्दल नीतू यांना कळताच त्या तातडीने दिल्लीत पोहोचल्या. आलियाही गंगूबाई काठियावाडी सिनेमाचं चित्रीकरण संपवून रणबीरसोबत दिल्लीत दाखल झाली.

ऋषी कपूर यांना कोणत्या कारणाने रुग्णालयात भरती केलं हे अजून कळू शकले नाही. कर्करोगावरील उपचारानंतर भारतात परतल्यावर ऋषी यांनी लगेच काम करायला सुरुवात केली. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द बॉडी’ सिनेमात ते अखेरचे दिसले होते. या सिनेमात त्यांच्यासोबत इम्रान हाश्मीचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here