मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सध्याच्या करोनाचे संकट लक्षात घेता ही भाडेवाढ विशिष्ट पद्धतीने करावी असे ग्राहक पंचायतीने सरकारला सूचवले आहे. करोनामुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तसेच अनेकांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. हे लक्षात घेता सर्वसामान्यांच्या मिळकत घटल्याने सुरुवातीच्या भाड्यात थेट ३ रुपयांनी वाढ करणे आणि सोबत दर किलोमीटरला दोन रुपयांहून अधिक वाढ करणे म्हणजे ग्राहकांच्या हालअपेष्टांमध्ये अधिकच भर घालण्यासारखे होईल, असे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे. अशी भाडेवाढ झाल्यास लोक रिक्षा आणि टॅक्सीचा कमी वापर करतील अशी भितीही पंचायतीने व्यक्त केली आहे.
पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीत ही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. यामुळे भाडेवाढ होणे अनिवार्य होते. मात्र सद्यस्थिती लक्षात घेता एकदम भाडेवाढ करणे योग्य होणार नसल्याचे पंचायतीला वाटते. रिक्षा युनियनने देखील करोना स्थितीत भाडेवाढ करू नये अशीच मागणी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबई ग्राहक पंचायतीने शासनाला सूचवले पर्याय
येत्या १ मार्चपासून होणारी भाडेवाढ आत्ताच न करता ती किमान सहा महिने पुढे ढकण्यात यावी, असा पर्याय मुंबई ग्राहक पंचायतीने सूचवला आहे. त्याच प्रमाणे ही भाडेवाढ रिक्षा टॅक्सी चालकांचे उत्पन्न वाढवणारी जरूर असावी, मात्र ती सर्वसामान्य ग्राहकाला देखील सुसह्य असावी, असे पंचायतीने म्हटले आहे. १ मार्चपासून वर्षभराच्या कालावधीसाठी सुरुवातीच्या भाड्यात १ रुपया भाडेवाढ करावी आणि पुढील दर किलोमीटरमागे ७५ पैसे इतकी वाढ करावी, असा पर्याय ग्राहक पंचायतीने सूचवला आहे. तसेच उरलेली भाडेवाढ ही एक वर्षानंतर करावी असे पंचायतीने म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
हे पर्याय योग्य वाटत नसतील तर सुरुवातीच्या भाड्यात २ रुपये वाढ करावी आणि पुढील दर किलोमीटरसाठी २ रुपये १ पैसा आणि २ रुपये ९ पैसे ही वाढ मात्र एका वर्षासाठी स्थगित करावी हा तिसरा पर्याय देखील मुंबई ग्राहक पंचायतीने शासनाला सूचवला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times