म. टा. प्रतिनिधी,
गणेश खिंड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौकात मुंबईहुन पुण्याच्या दिशेने आलेल्या एका चारचाकी गाडीला रात्री दहाच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. गाडीतून वास आल्यामुळे चालकाने गाडी बाजूला घेऊन खाली उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हडपसर परिसरातील एक कापड व्यावसियक मुंबईत कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. मंगळवारी कपडे खरेदी केल्यानंतर ते पुण्याच्या दिशेने येत होते. रात्री दहाच्या सुमारास विद्यापीठ चौकात चालकास गाडीतून जळाल्याचा वास आला. त्यामुळे त्याने गाडी बाजूला घेऊन पाहणी केली. त्यावेळी गाडीने आचानक पेट घेतला. आवघ्या काही वेळात गाडीच्या समोरील भाग जळाला.

क्लिक करा आणि वाचा-

घटनेची माहिती मिळताच औध अग्निशन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी गाडीच्या मालकाने सांगितले, मुंबईहून येताना वाहतूक कोंडीत गाडी बराच वेळ अडकली होती. त्यामुळे गाडी गरम झाल्यामवळे आग लागली असावी.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here