वाचा:
वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. १३ तालुक्यातील विविध गावांमध्ये रुग्ण वाढत असून त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्याचा सर्व्हे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आला आहे. त्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
वाचा:
पुणे शहरातही धोका वाढतोय
पुणे शहरात चाचण्या वाढल्याने त्याचा परिणाम रुग्णवाढीवर होत असल्याचे दिसत आहे. रविवारी ६३४ रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी पुन्हा ६६१ रुग्ण आढळल्याने रुग्णवाढीचा धोका निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे मंगळवारी पॉझिटिव्हिटी दर हा १४.३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता नियमांचे पालन करण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी आवाहन केले.
वाचा:
राज्यातील स्थिती
– राज्यात मंगळवारी ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ % एवढा आहे.
– गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान तर ५ हजार ८६९ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ५ हजार ८५१ करोना बाधित रुग्ण झाले बरे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६% एवढे झाले आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५८,६०,९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,१२,३१२ (१३.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
– सध्या राज्यात २,७९,२८८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २,४८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times