सांस्कृतीक व पर्यटन मंत्री उषा ठाकूरही मास्क न लावता विधानसभेत पोहोचल्या. यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘मी हनुमान चालीसाचे पठण करते. मी रोज शंख फुंकते. काढा पिते. शेणाच्या गोवऱ्यांवर हवन करते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हा माझा करोनापासून बचाव आहे. मी गळ्यात गमछा ठेवते, जर कोणी जवळ आलं तर मी तो तोंडावर ठेवते. वेदांना १० हजार वर्षे पूर्ण होत आहेत. जगात ज्याला उत्तम मार्गाने जगायचे आहे त्याने वैदिक जीवनशैली अंगीकारली पाहिजे. त्याला कुठला आजार स्पर्शही करू शकत नाही, असं ठाकूर म्हणाल्या.
फक्त भाजपचेच नव्हे तर बसपाच्या आमदार रमाबाई परिहार याही मास्क न लावता विधानसभेत दाखल झाल्या. ‘ज्याच्यात धैर्य आहे, केवळ तोच काहीतरी करु शकतो. मास्क न लावल्याबद्दल जो काही दंड असेल तो मी भरेन. मास्क लावल्याने मला घाबरल्यासारखं होतं’, असं रमाबाई परिहार म्हणाल्या.
मंत्री म्हणाले- इंदूरमध्ये चाट-भजी खाल्ल्याने रुग्णवाढ
इंदूरमध्ये करोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यावर मंत्र्यांनी उत्तर दिलंय. लोकं रस्त्यावर चाट भजी खायला जातात. विनाकारण रस्त्यावर जाण्याची गरज नाही. यामुळेच रुग्णवाढ झाली आहे. इंदूरमध्ये सोमवारी करोनाचे १०२ नवीन रुग्ण आढळले आहेत. संसर्ग झालेल्यांची संख्या ५७ हजारांवर पोहोचली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times