नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते ( ) यांची मंगळवारी तिरुवनंतपूरममध्ये प्रचार सभा झाली. दक्षिण आणि उत्तर भारत राजकारणामुळे विभागला गेला, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकारण तापलं आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेत्यांनी आता राहुल गांधींवर टीका करत सल्लाही दिला आहे.

उत्तर-दक्षिणेतील राजकारणावर राहुल गांधींचे भाष्य

‘पहिली १५ वर्षे आपण उत्तरेकडील खासदार होतो. आपल्याला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. केरळला येणं आपल्यासाठी खूप नवीन होतं. कारण इथल्या नागरिकांना फक्त विषयांतच रस नाही तर ते त्या मुद्द्यांच्या तपशीलात जाण्याची रुचीही आहे, असं राहुल गांधी म्हणाले. खरं तर राहुल गांधी २०१९ मध्ये केरळच्या वायनाडमधून खासदार म्हणून निवडून आले. राहुल गांधी यांनी दोन ठिकाणांवर निवडणूक लढवली. पण स्मृती इराणी यांनी त्यांचा अमेठीतून त्यांचा पराभव केला.

परराष्ट्रमंत्र्यांनी राहुल गांधींना भूगोल समजवला

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर जोरदार टीका करत उत्तर व दक्षिण भारत समजवला. ‘माझा संबंध दक्षिणेशी आहे. पण मी पश्चिमेतील राज्याचा खासदार आहे. माझा जन्म उत्तर भारतात झाला. लहानाचा मोठा तिथेच झालो. तिथेच शिक्षण घेतलं आणि तिथे कामही केलं. मी जगासमोर संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व केले. भारत एक आहे, त्याला प्रदेशिकतेवरून विभागू नका, त्याचे तुकडे करू नका’, असं एस. जयशंकर म्हणाले.

योगींनी वाजपेयींची आठवण करून दिली

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावरून हल्ला चढवला. ‘श्री. राहुल गांधी, आदरणीय अटल जी म्हणाले होते की,’ भारत हा जमिनीचा तुकडा नाही, तर एक जिवंत राष्ट्रपुरुष आहे’. कृपया आपल्या क्षुद्र राजकारणासाठी प्रादेशिकते’च्या तलवारीने कापण्याचा प्रयत्न करू नका. भारत एक होता, एक आहे, आणि एक राहील. भारत माता की जय’, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

जेपी नड्डांचीही राहुल गांधींवर टीका

योगी आदित्यनाथ यांच्यानंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही राहुल गांधींवर हल्ला चढवला. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी ईशान्येत होते, त्यावेळी पश्चिम भारताबद्दल विष ओकत होते, आज ते दक्षिणेत आहेत आणि उत्तर भारताबद्दल विष ओकत आहेत. फूट पाडा आणि राजकारण करा, हे आता चालणार नाही. जनतेने अशा प्रकारचे राजकारण संपवले आहे, गुजरातमध्ये काय घडले ते पाहा, अशी टीका नड्डा यांनी केली.

काय म्हणाले राहुल गांधी?

अलिकडेच मी अमेरिकेतील काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मी त्यांना सांगितले मला केरळ, वायनाडला जायला आवडतं. ही फक्त आसक्तीच नाही. एक जवळचा संबंध आहे. कारण आपण ज्या प्रकारे राजकारण करता त्यामुळेच, असं राहुल गांधी म्हणाले. ‘ज्या हुशारीने तुम्ही राजकारण करता, हा माझ्यासाठी शिकण्यासारखं आहे आणि मजेदारही आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here