म. टा. खास प्रतिनिधी,

दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी एक-दोन नाही, तर तब्बल १४ पानी चिठ्ठी लिहिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, खासदाराच्या लेटरहेडवर गुजराती भाषेत ‘सुसाइड नोट’ असे शीर्षक देऊन त्यांनी मजकूर लिहिला आहे. डेलकर यांच्या कटुंबीयांचे जबाब नोंदविल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले असून यामुळे चिठ्ठीत नावे असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

वाचा:

मरीन ड्राइव्ह येथील हॉटेल ‘सी ग्रीन साऊथ’मध्ये सोमवारी दुपारी मोहन डेलकर हे मृतावस्थेत सापडले. हॉटेलमध्ये त्यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. यामध्ये संशयास्पद असे काहीच नसून हे आत्महत्याच असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाल्याचे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले. डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या लेटरहेडवर १४ पानांची सुसाइड नोट लिहिली असून यामध्ये आपण कशामुळे नैराश्यामध्ये होतो, याबाबत सविस्तर नमूद केले आहे. यामध्ये त्यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावेदेखील लिहिली आहेत. या अधिकाऱ्यांकडून वारंवार अपमानित केले जात होते, असे त्यांनी म्हटले आहे. या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होणार का? याबाबत विचारले असता डेलकर यांचे कुटुंबीय, चालक, सुरक्षारक्षक यांचे सविस्तर जबाब नोंदविल्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे हा अधिकारी म्हणाला. चिठ्ठीतील हस्ताक्षर तपासण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

मुंबईच का?

चौदा पानी चिठ्ठीवरून डेलकर यांनी आधीपासूनच जीवन संपविण्याचे ठरविले होते, हे दिसून येते. परंतु त्यांनी यासाठी मुंबईच का निवडली? मुंबईत घर असूनही ते हॉटेलमध्ये का थांबले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही पोलिस करीत आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील खटल्यासंदर्भात ते मुंबईत आले होते असे सांगण्यात येत आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here