मुंबई: ‘ हेच पूजा चव्हाणचे मारेकरी आहेत आणि मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत’, अशी मागणी प्रदेश उपाध्यक्षा यांनी आज केली. पोहरादेवी येथे राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनावरही वाघ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ( )

वाचा:

बीडच्या परळी वैजनाथ येथील २२ वर्षीय तरुणी हिने पुण्यात आत्महत्या केली होती. या घटनेनंतर काही ऑडिओ क्लिप समोर आल्याने संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गेले १४ दिवस नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज प्रथमच माध्यमांना सामोरे गेले. बंजारा समाजाची काशी अशी ख्याती असलेल्या पोहरादेवी येथील धर्मपीठावर राठोड यांनी दर्शन घेतले व त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर आपली बाजू मांडली. आपल्यावरील सारे आरोप फेटाळतानाच विरोधक घाणेरडं राजकारण करून मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र, चौकशीत सत्य समोर येईलच, असा पवित्रा राठोड यांनी घेतला. यावेळी राठोड समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. या सर्वाचाच चित्रा वाघ यांनी समाचार घेतला.

वाचा:

‘संजय राठोड हेच पूजा चव्हाणचे मारेकरी आहेत’ असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला. ‘आपण शेण खायचं आणि बचावासाठी समाजाला वेठीला धरायचं असा प्रकार आज पोहरादेवी येथे घडला आहे. खरंतर ही घाण एक क्षणही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असायला नको. ताबडतोब त्याला मंत्रिमंडळातून हाकललं पाहिजे मात्र, बलात्कारी मंत्र्यांना पाठिशी घालण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ एकजूट झालं आहे. त्यांची बाजू घेण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीत चढाओढ लागली आहे. हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही’, अशा तीव्र शब्दांत वाघ यांनी निशाणा साधला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ढळढळीत पुरावे उपलब्ध आहेत. त्यानंतरही पोलीस हाताची घडी घालून गप्प का आहेत?, असा सवालही वाघ यांनी केला.

वाचा:

करोना संसर्ग वाढत असताना व सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले असताना पोहरादेवीत इतकी गर्दी का झाली याचा जाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच संजय राठोड यांना विचारायला हवा, अशी मागणीही यावेळी वाघ यांनी केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here