पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले संजय राठोड हे सपत्नीक पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. तिथं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आरोपांवर स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, संजय राठोड यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. संजय राठोड यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा होत होत्या. तसंच, काल शरद पवारांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती. तिथंही या विषयावर चर्चा झाल्याचं समजतंय. त्यामुळं मुख्यमंत्री संजय राठोड यांच्यावर काय कारवाई करणार, हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. यासर्व प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आज प्रसारमाध्यामांसोबत ते बोलत होते.
वाचाः
‘पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झालं आहे. हजारोंच्या संख्येनं लोक जमा झाले यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची व नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. या प्रकरणात राज्य सरकारपणे कायद्याचे पालन केले जाईल,’ असं स्पष्टीकरण राऊत यांनी केलं आहे.
वाचाः
पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी जमलेल्या गर्दीबाबत विचारल्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असं म्हटलं आहे. तसंच, राठोड यांच्या शक्तीप्रदर्शानावर मुख्यमंत्री नाराज आहेत का? या प्रश्नावर मात्र राऊतांनी बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्याबाबतीत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times