मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यांना पुण्यातील कथित प्रकरणी ८ मार्चपर्यंत दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने खडसे यांच्या याचिकेवरील सुनावणी आज होऊ न शकल्यानं ८ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.

पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने बजावलेल्या समन्सप्रमाणे खडसे ईडीसमोर हजर झाल्यानंतर त्यांची अनेक तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांनी या कारवाईला आव्हान देणारी याचिका केली. खडसेंच्या याचिकेवर आज सुनावणी होती. मात्र, ही सुनावणी आज पूर्ण होऊ न शकल्यानं पुढील सुनावणी ८ मार्चला होणार आहे.

वाचाः

आज काही कारणांमुळं एकनाथ खडसे यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ न शकल्यानं न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने सुनावणी ८ मार्चला ठेवली आहे. त्यामुळं पुढील सुनावणीपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई न करण्याची हमी ईडीने कायम ठेवली आहे.

वाचाः

दरम्यान, पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवरच खडसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून सातत्याने सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत खडसे यांनी गेल्या वर्षी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here