अजयला त्यांचं लग्न साधेपणानं करायचं होतं. म्हणून अजयच्या घराच्या गच्चीवरच त्यांचं शुभमंगल पार पडलं. आम्ही दोघेही पाहता क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि लगेचच लग्नाचा निर्णय घेतला, असंही अजय म्हणाला. प्रत्येक नात्याला बहरण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो असा कानमंत्रदेखील त्यानं यावेळी दिला.
काजोल म्हणाली की, आईने तिला एक गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे नेहमी आपलं मन काय सांगतं ते ऐकावं. त्यानंतर मी अजयसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाच. आणि २४ फेब्रुवारी १९९९मध्ये लग्न केलं.
काजोलच्या वडिलांनी नव्हती दिली परवानगी
काजोल आणि अजय यांच्या लग्नासाठी वडिलांची परवानगी नव्हती. त्यांच्या संमतीशिवाय लग्न केल्याचं काजोलनं या मुलाखतीत म्हटलं आहे.काजोल आणि अजय यांचा सुखी संसार सुरू आहे. न्यासा आणि युग अशी त्यांची दोन मुलं आहेत. पालकांची जबाबदारी दोघंही उत्तमप्रकारे सांभाळतायत. दोघंही सिनेसृष्टीतही सक्रिय आहेत. काजोलचे वडिल शोमू मुखर्जी अवघ्या २४ व्या वर्षी लग्न करण्याच्या काजोलच्या निर्णयाविरोधात होते. त्यांना वाटत होतं की, काजोलनं आणखी काम करावं आणि मगच लग्नाचा निर्णय घ्यावा. पण काजोलची आई तनुजा यांचा काजोलच्या लग्न करण्याच्या निर्णयला पाठिंबा होता. असं काजोलनं सांगितलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times