मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. असं असलं तरी संजय राठोड यांच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर केलेलं शक्तिप्रदर्शनावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तर, शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली असल्याचं बोललं जात आहे.

करोना संसर्गानं राज्यात पुन्हा उचल खाल्यानं मुख्यमंत्र्यांनी राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध आणल्यानंतर मंत्रिमंडळातील नेत्याकडूनच नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोप विरोधकांनी केला. भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

वाचाः

‘करोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु पण गर्दी जमवणाऱ्या एका गबरुवर कारवाई नाही?. एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात तो मी नव्हेच हे सुरु आहे,’ असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.

वाचाः

पोहरादेवी गर्दीबाबत कारवाई होणार?

जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री यांनी गंभीर दखल घेतली असून करोना संकटाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here