राजेश टोपे पत्रात लिहतात की, ‘शाळा महाविद्यालये सुरु झाले आणि करोना नुकताच वाढताना दिसतोय. करोना विरुद्ध लढाई गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. तुमच्या खेळण्याचं, बागडण्याचं हे वय, क्रिडांगणावर घाम गाळण्याचे हे वय परंतु गेले वर्षभर तुम्हाला घरातच बसावं लागलं. करोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे,’ असं आरोग्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.
वाचाः
आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे मदत मागतानाच स्वतःची काळजी घेण्याचंही आवाहनही केलं आहे. राजेश टोपे पुढे म्हणतात की, प्रथम तुम्ही तुमचीच काळजी घ्या, त्याच बरोबर आपल्या आई- वडिलांची, भावा- बहिणींची व तसेच शेजाऱ्यांची ही काळजी घ्या. आई वडिलांना कामानिमित्त बाहेर जावं लागतं. बाहेरुन आल्यावर त्यांनी हात- पाय स्वच्छ धुतलेत का नाही ते पाहा, त्यांनी बाहेर जाताना मास्क लावला का नाही ते पाहा, शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले जातात का नाही ते पाहा. जर कदाचित करोनाचे काही लक्षण दिसलेच तर लगेच सरकारी दवाखान्यात त्यांना घेवून जा, त्यांची काळजी घेण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.’
वाचाः
‘आजचा विद्यार्थी व तरुण देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे. तरुणाचं शरीर, सुदृढ, मन सकारात्मक व बुद्धी सतेज पाहिजे तरच त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात. तेव्हाच तो जीवनात यशस्वी होतो.’ असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times