म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले वनमंत्री यांनी आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत असल्याचे सांगितले. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवी येथे मंगळवारी शक्तिप्रदर्शन केल्यानंतर राठोड बुधवारी सकाळी यवतमाळहून निघून नागपूर मार्गे मुंबईला रवाना झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत.

वादात अडकल्यानंतर आतापर्यंत गायब असणारे वनमंत्री मंगळवारी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात दिसले. रात्री यवतमाळ येथे मुक्काम केला.
नियमित कामाला आजपासून सुरुवात करत आहे. पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे राठोड यांनी यवतमाळ येथे मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. मात्र, ही भेट मंत्रिमंडळ बैठकीत की मातोश्री वा सह्याद्री अतिथीगृहात होणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नाराजीकडे लक्ष वेधले असता, त्यांनी बोलण्याचे टाळले.

वाचाः

आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याऐवजी लोकांवर गुन्हे दाखल झाल्याबाब विचारले असता, पोहरादेवी येथे गर्दी करू नये, असे आवाहन केले होते. करोनाबाबत सर्वांनी गंभीर असणे आवश्यक आहे. नागरिक स्वयंस्फूर्तीने आले, असा दावा राठोड यांनी केला.

वाचाः

मुंबईला जाण्यासाठी संजय राठोड पत्नी व मेहुण्यासह यवतमाळहून उपराजधानीत आले. ते नागपूरचे संपर्क मंत्री असले तरी, विमानतळावर एकही पदाधिकारी वा शिवसैनिक नव्हता. कुणालाही न भेटता ते विमानतळाच्या आत गेले. मीडियाच्या प्रतिनिधींनी संवाद साधण्याचा बराच प्रयत्न केला पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here