नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. आतापर्यंत एकूण ११ ऑडिओ क्लिप बाहेर आलेल्या आहेत. याचा अर्थ काहीतरी संबंध आहे आणि कोही आत्महत्येचा नसून तो खूनच आहे. त्यांचे आणि तिचे संबंध बाहेर आले आहे. यात संजय राठोड याचे नाव घेतले जात आहे. त्यानंतर ते १५ दिवस फरार होते. १५ दिवसांनंतर ते बाहेर आले आणि थेट मंदिरात गेले, असे म्हणत मंदिरात जायला ते संत आहेत का असा सवालही राणे यांनी विचारला आहे.
संजय राठोड पळत आहेत. त्यांच्यावर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप होत आहेत, असे सांगत आरोप असताना आरोपाला सामोरे गेले पाहिजे, पळता कशाला. चोरी केल्याशिवाय पळत आहेत का? असा प्रश्नही राणेंनी विचारला
क्लिपमधील आवाज खरा आहे की खोटा हे हे सरकारने आम्हाला सांगावे, असे आवाहनही राणे यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार आहे. सत्ताधारी असलेले पक्ष आपली माणसे सांभाळण्याचे काम करत आहेत. आधी एकाने केले, त्यानंतर आता शिवसेना करत आहे, अशा शब्दांत नारायण राणे यांनी हल्लाबोल केला आहे. यावेळी राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील टीका केली.
संजय राठोड प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पळत असल्याची टीकाही राणे यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
नारायण राणे यांचा सरकारवर हल्लाबोल
पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावर बोलताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार विनयभंग करणाऱ्यांना, बलात्कार करणाऱ्यांना आणि हत्या प्रकरणांमधील लोकांना पाठीशी घालत आहे, असे गंभीर आरोप राणे यांनी सरकारवर केले आहेत. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण अशा प्रकरणांमधील आरोपींनाही सरकार पाठिशी घालत असल्याचे ते म्हणाले. या सरकारला असे करण्याचे लायसन्य दिले आहे का, असा खोचक सवालही राणेंनी विचारला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times