सिंधुदुर्ग: पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी () वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर हल्लाबोल करताना भाजपचे खासदार (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री (CM ) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते () यांच्या कृपेने मुख्यमंत्रिपदी बसले आहेत. हे सरकारच पवार यांच्या कृपेमुळे आहे. नाहीतर असा मुख्यमंत्री कोणी केला असता?’, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (bjp mp criticise cm uddhav thackeray)

नारायण राणे हे सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यापेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे कानून माहीत असलेला आहे, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावर बोलताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. मात्र या आरोपांना सामोरे जायचे सोडून संजय राठोड पळत आहेत. समोर या आणि आरोपांना उत्तरे द्या, चोरी असल्याशिवाय व्यक्ती पळतो का?, असा सवालही राणे यांनी केला.

क्लिक करा आणि वाचा-

सरकारने बलात्काऱ्यांना पाठीशी घातले- राणे

राठोड यांच्यावर हल्लाबोल करताना राणे यांनी ठाकरे सरकारवरही टीकेचे बाण चालवले. पूजा चव्हाण- संजय राठोड संबंधात आतापर्यंत ११ क्लिप बाहेर आल्या आहेत. या क्लिपमध्ये आवाज कोणाचा आहे?, या क्लिप खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी करतानाच हे सरकार विनयभंग करणाऱ्यांना, बलात्कार करणाऱ्यांना आणि हत्या प्रकरणांमधील लोकांना पाठीशी घालत आहे, असे गंभीर आरोप राणे यांनी सरकारवर केले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण अशा प्रकरणांमधील आरोपींनाही हे सरकार पाठिशी घालत आहे, असाही आरोप त्यांनी ठाकरे सरकारवर केला. या सरकारला असे करण्याचे लायसन्य दिले आहे का, असा खोचक सवालही राणेंनी केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here