या बरोबरच राज्यात दिवसाला मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ होत असून आज राज्यात एकूण ८० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ५१ इतकी होती. आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ०८ हजार ६२३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७० टक्के इतके झाले आहे.
तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५९ लाख ४१ हजार ७७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख २१ हजार ११९ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.३६ टक्के इतके आहे. सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर २ हजार ४४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील अॅक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण
राज्यात कालच्या तुलनेत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढून ती आज एकूण ५९ हजार ३५८ इतकी झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती ६ हजार ९०० इतकी झाली आहे. तर ठाण्यात ही संख्या ६ हजार ५५२ इतकी. तर, पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजार ४२७, नाशिक येथे १,७६५, अहमदनगर येथे १,१३२, औरंगाबाद येथे १,५५९, नागपूर येथे ७ हजार ८५१, कोल्हापूर येथे २२६ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात असून सर्वात कमी रुग्णसंख्या गडचिरोली आहे. येथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८४ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times