नवी दिल्ली : एकीकडे ई-कॉमर्समध्ये अमेरिकन कंपनी अॅमेझॉनशी मागील वर्षभरापासून दोन हात करणाऱ्या अंबानी यांनी आता नव्या व्यापारी युद्धाची तयारी केली आहे. इलेक्ट्रिक मोटारीसाठी लागणाऱ्या बॅटरी उत्पादनात उतरून या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील अग्रगण्य कंपनी टेस्लासमोर आव्हान उभं करणार आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांना आता इलेक्ट्रिक मोबिलिटीची इंडस्ट्री खुणावत आहे.

रिलायन्स रिटेल आणि फ्युचर रिटेल यांच्यातील २४ हजार कोटींचा व्यवहार कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझॉस यांनी मुकेश अंबानी यांना आव्हान दिले आहे. तर आता आणखी एक व्यापारी युद्धाचा आरंभ होण्याची शक्यता आहे.

विजेवर चालणाऱ्या मोटारींसाठी लागणाऱ्या बॅटरी आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राची बाजारपेठ झपाट्याने वाढणार आहे. एका अभ्यासानुसार पुढील १० वर्षात ई-बॅटरी उद्योगाची उलाढाल ५० अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अंबानी यांनी या क्षेत्रातील औद्योगिक संधीवर लक्ष केंद्रित केलं आहे. या क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजकडून सुरुवातीला किमान १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

भारतात ई-मोटारींचे पर्व लवकरच सुरू होणार आहे. यात महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे तयारी सुरु केली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार नवीन ऊर्जा आणि नव्या इंधन व्यवसायाला चालना देण्यासाठी तयार असल्याचे रिलायन्सने म्हटलं आहे. नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजने तेल आणि रसायन उद्योगाचे विभाजन केले होते. अशा प्रकारचा निर्णय हा रिलायन्सची नव्या उद्योगात एंट्री घेण्याची तयारी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

वाचा :

ई मोटारींच्या बॅटरी निर्मितीमध्ये उतरण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात रिलायन्सने प्रवेश केला तर त्यांची थेट स्पर्धा इलेक्ट्रिक मोटार निर्मितीतील आघाडीची कंपनी टेस्लाशी होईल. गेल्या वर्षी अंबानी यांनी इलेक्ट्रिक मोटार उद्योगासाठी आवश्यक टेक्नाॅलाॅजी उपलब्ध असल्याचे समभागधारकांना सांगितले होते.

इलेक्ट्रिक मोटार उद्योगात टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. बॅटरी आणि सोलर पॅनलमधून एलन मस्क कोट्यवधींची कमाई करत आहेत. इलेक्ट्रिक मोटार निर्मितीतून मस्क यांनी प्रचंड कमाई केली आहे. त्यामुळे या क्षेत्रात असलेल्या व्यावसायिक संधींचा अंबानी यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. अंबानी बॅटरी निर्मितीमध्ये उतरतील तसेच वीज साठवणूक (स्टोरेज) उत्पादनांमध्ये उतरतील, असाही अंदाज बांधण्यात आला आहे. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजकडून अद्याप याबाबत कोणताच प्लॅन जाहीर करण्यात आलेला नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here