मुंबई: पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी () ज्यांचे नाव जोडले गेले आहे, ते राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते (sanjay rathod) यांनी आज मुख्यमंत्री () यांची भेट घेतली. राठोड यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तब्बल दीड तास वाट पाहावी लागली. विशेष म्हणजे तत्पूर्वी संजय राठोड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरीही लावली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि राठोड यांची काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री संजय राठोड यांना अभय देणार की, राजीनामा घेणार याबाबत स्पष्टता नाही. (forest minister meets cm uddhav thackeray)

वनमंत्री संजय राठोड यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हवाल्याने दिले आहे. पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी नाव आल्यानंतर तेव्हापासून कथित स्वरुपाच गायब झालेले वनमंत्री राठोड मंगळवारी लोकांसमोर आले. त्यावेळी त्यांनी पोहरादेवी मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व राज्याला सार्वजनिक कार्यक्रम न करण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही राठोड यांच्या समर्थकांनी कोविडचे सर्व नियम पायदळी तुडवत तोबा गर्दी केली होती.

एकूणच सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्याच प्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक मंत्रीही राठोड यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांच्याबाबतीत निर्णय घ्यावा अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची अपेक्षा असल्याचे सूत्रांी सांगितले. मात्र, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच राठोड यांनी हजेरी लावल्याचे वृत्त आल्याने मुख्यमंत्र्यांची नाराजी दूर झाली का?, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

क्लिक करा आणि वाचा-
पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे वनमंत्री राठोड यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तसेच पोहरादेवी गडावर जमा झालेली गर्दी ही आपण बोलावलेली नव्हती तर तिथे लोकच स्वत:हून आले होते, असेही राठोड यांनी स्पष्ट केले आहे. गर्दीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here