मुंबई: राज्याची राजधानी मुंबईवरील संसर्गाचा विळखा पुन्हा एकदा घट्ट होऊ लागला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल १ हजार १६७ नवीन करोना बाधितांची भर पडली असून गेल्या चार महिन्यांतील हा उच्चांक ठरला आहे. मुंबईसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, सोबतच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही नवीन बाधितांची संख्या वाढत असून मंडळात येत असलेल्या या संपूर्ण भागात आज २ हजार १८ इतक्या नवीन बाधितांची भर पडली आहे. ( )

वाचा:

मुंबई महापालिका हद्दीतील करोना रुग्णवाढ ही पालिकेच्या आरोग्य विभागासाठी आव्हान देणारी आणि मुंबईकरांची चिंता वाढवणारी ठरली आहे. गेले काही महिने मुंबईत करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले होते. दरम्यान, राज्याच्या अन्य भागात करोनाने डोके वर काढले असताना आता मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्याही वेगाने वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईतील नवीन बाधितांचा आकडा वाढत असून आज हा आकडा हजारपार गेल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. चिंतेची बाब म्हणजे गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या आज नोंदवली गेली आहे.

वाचा:

मुंबईत आज १ हजार १६७ नवीन रुग्णांची भर पडली असून ११९ दिवसांनंतर मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या वर गेली आहे. १८ नोव्हेंबर २०२० रोजी मुंबईत १ हजार रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज हा आकडा ओलांडला गेला आहे. मुंबईत करोनामृत्यूंचे प्रमाण मात्र कमी आहे. आज पालिका हद्दीत ४ करोनामृत्यूंची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत करोनाचे एकूण ३ लाख २१ हजार ६९८ रुग्ण आढळले आहेत तर ११ हजार ४५३ जणांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे. मुंबईत सध्या करोनाचे प्रत्यक्षात ६ हजार ९०० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

वाचा:

ठाणे जिल्ह्यात ६१४ नवीन रुग्णांची वाढ

ठाणे जिल्ह्यातही आज करोना रुग्णांच्या संख्येने उसळी घेतली. आज एकूण ६१४ नवीन रुग्णांची वाढ झाली. यापैकी ठाणे शहरात सर्वाधिक १७७ रुग्ण आढळले असून १६५, १३०, उल्हासनगर १४, भिवंडी ३, मिरा-भाईंदर ५०, अंबरनाथ १९, बदलापूर ३२, ठाणे ग्रामीणमध्ये २४ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २ लाख ६२ हजार २८० वर पोहचली आहे. तर दिवसभरात जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा वाढत ६ हजार २५१ इतका झाला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here