म. टा. प्रतिनिधी, मुंबई

नावे बदलण्याच्या धुंदीत भारतरत्न () मिळालेल्या महापुरुषांचा अवमान भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik) यांनी केला आहे. ( criticizes bjp over stadium name changing in ahmedabad)

अहमदाबादमध्ये भारतरत्न () यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नाव बदलून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ()यांचे नाव देण्यात आले आहे. यावर नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.

जगातले सर्वात मोठे स्टेडियम मोटेरा अहमदाबाद येथे होते आहे याचा आम्हाला आनंद आहे परंतु भारतरत्न असलेल्या महापुरुषांची नावे बदलण्याची परंपरा सरकारने सुरू केलीय याचे दु:ख वाटते असे नवाब मलिक म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे त्या स्टेडियमचे नाव भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावाने ओळखले जात होते. आता ते नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. हरियाणामध्येही स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे देण्यात आले आहे. नावे बदलण्याच्या धुंदीत भाजप सरकार सर्व मर्यादांचे उल्लघंन करीत आहे.

क्लिक करा आणि वाचा-
आतापर्यंत शहरांची नावे बदलली जात होती आता तर भारतरत्नांची नावे असलेली हॉस्पिटल आणि स्टेडियम बदलली जात आहेत ही दु:खाची बाब असून देशाची जनता कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here