म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथील सुभेदार लक्ष्मण सतू डोईफोडे (वय ४५) यांचे आसाममध्ये कर्तव्य बजावताना अपघाती निधन झाले. डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.
सुभेदार डोईफोडे हे सिग्नल कोअरमध्ये कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती आसाम येथे होती. गस्तीवर असताना गाडी दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.
डोईफोडे यांच्या निधनाची माहिती कळताच बोराटवाडी गावासह इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली. शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी डोईफोडे यांचे पार्थिव बोराटवाडी येथे आणण्यात येईल. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times