पालघर: पालघर बोईसर रस्त्यावर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उमरोळी पेट्रोल पंपनजीक झाला. या अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव ईको चालक सुनील मोरेश्वर गावड (३२) असे असून तो उमरोळी गावचा रहिवासी आहे. हा विचित्र अपघात इको प्रवासी वाहन, खासगी चारचाकी आणि एका दुचाकी एकमेकांना धडकून झाला.

ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात इको कारचा चालक सुनील गावड याचा मृत्यू झाला. अपघातात दोघांना गंभीर दुखापच झाली. अपघातात हे दोघे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत फेकले गेले. या अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे परिसरात पसरले. त्यानंतर अपघातस्थळी लोकांची मोठी गर्दी झाली.

अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असली तरी देखील या अपघातातील जखमींच्या मदतीसाठी कोणीही पुढे येण्यास तयार नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या मितेश प्रभाकर पाटील,अमोल पाटील व आशिष कुडू या तीन मित्रांनी धाडस दाखवले आणि तातडीने जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेले. मात्र या अपघातात इको चालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

क्लिक करा आणि वाचा-
या अपघातातील गंभीर दुखापत झालेल्या दोघांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here