वाचा:
याबाबत (वय ४०,रा. अॅक्सिस स्ट्रीट बाणेर रोड) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार रामेश्वर वाघाजी तडसे (वय ३५, रा. ) व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांना झोमॅटोवरून ऑर्डर आली होती. ती ऑर्डर रामेश्वरला देण्यात आली होती. त्यानुसार अग्रवाल यांनी त्याला फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. याबाबत अग्रवाल यांनी झोमॅटोला कळवले होते. त्यानुसार त्यांनी दुसर्या रायडरला ऑर्डर पोहच करण्यासाठी हॉटेलला पाठवले होते.
वाचा:
दरम्यान रामेश्वर हा त्या ठिकाणी आला. माझी ऑर्डर का कॅन्सल केली, असे म्हणत शिवीगाळ करून अग्रवाल यांच्या डोक्यात लोखंडी स्टँड मारून जखमी केले. तर त्याच्यासह इतर साथीदारांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून हॉटेलच्या दरवाजाची तोडफोड केली. अग्रवाल यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times