नवी दिल्लीः ‘केंद्र सरकारने संरक्षणमंत्री ( ) यांना पिंजऱ्यातील पोपट बनवून ठेवले आहे. पण सरकारने त्यांना सूट दिली आणि त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा ( ) केली तर शेतकरी आंदोलनावर ( ) त्वरित तोडगा निघेल. पण हे सरकार हट्टी आहे’, असं शेतकरी नेते राकेश टिकैट यांचे बंधू आणि भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत ( ) म्हणाले. नरेश टिकैत यांचं हे मोठं वक्तव्य आहे. नरेश टिकैत हे उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे आयोजित शेतकरी सभेत बोलत होते.

कृषिमंत्री म्हणाले- चर्चेची दारं खुली

कृषी कायद्यांवर शेतकऱ्यांशी चर्चेसाठी सरकारचे दरवाजे अद्यापही खुले आहेत. आम्ही शेतकऱ्यांशी बर्‍याचदा चर्चा केली आहे. पण अद्याप त्यांचा काही मुद्दा असेल तर आम्ही चर्चेला तयार आहोत, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

‘शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत राहणार’

सरकार पूर्ण संवेदनेने शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ १० कोटी शेतकर्‍यांना झाल्याचा दावा त्यांनी केला. शेतकर्‍यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ६००० रुपयांनी वाढले आहे. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास कटिबद्ध असून त्यांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे, असं तोमर म्हणाले.

शेतकरी नेते सतत तीव्र आंदोलनाचा इशारा देत असताना तोमर यांचे हे वक्तव्य आले आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी मंगळवारी सरकारला इशारा दिला. नवीन मागे घेण्यास सरकारवर दबाव आणण्यासाठी ४० लाख ट्रॅक्टर घेऊन संसदेवर मोर्चा काढू, याचे नियोजन करत आहोत. हा मोर्चा काढण्यापूर्वी सरकारला माहिती दिली जाईल. किमान आधारभूत किंमतीच्या (एमएसपी) हमीबाबत नवीन कायदा करावा, या मागणीचा पुनरुच्चारही टिकैत यांनी केला.

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रपतींना पत्र

कृषी कायद्यांविरोधात ९१ दिवसांपासून आंदोलन करणार्‍या ४० शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी दडपशाही विरोधी दिन साजरा केला. संयुक्त किसान मोर्चाकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्रही लिहिण्यात आले आहे. आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांच्या समर्थकांवरील दडपशाही थांबवली गेली पाहिजे, असं शेतकऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे.

दिशा रवी हिला जामीन मिळाल्याच्या निर्णयाचे संयुक्त किसान मोर्चाकडून स्वागत करण्यात आले. पोलिसांनी दिशाला बेकायदेशीरपणे अटक केली होती, असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला.

यासोबतच एसकेएमने हवामान कार्यकर्ते दिशा रवी यांना जामीन मिळण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून दिल्ली पोलिसांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. एसकेएमचे म्हणणे आहे की पोलिसांनी दिशा रवी याला बेकायदेशीररीत्या अटक केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here