भारतीय लसींमुळे करोनाच्या गंभीर आजारापासून निश्चितच बचाव होईल आणि करोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे होणाऱ्या मृत्युंचा मुद्दा असेल तर सध्या आपल्या लस ७० टक्के, ८० टक्के, ९० टक्के प्रभावी ठरू शकतात. त्यात काही प्रमाणात घसरण झाली तरीही त्या प्रभावी असतील, असं गुलेरिया म्हणाले.
‘सध्या आपल्याला घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. पण परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवणं आवश्यक आहे आणि करोनाच्या सर्व प्रकारांकडे आक्रमकपणे पाहण्याची गरज आहे. कोणताही स्ट्रेन नवीन होणार नाही आणि आपल्या लसींचा प्रभाव कायम राहील याची खात्री करुन घ्यावी लागेल. त्याचवेळी आपल्याला लस देखील बदलत राहण्याची गरज आहे. कारण करोनाचे नवीन-एन स्ट्रेन समोर येत आहेत’, असं गुलेरियांनी सांगितलं.
देशभरात लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांना सरकारी रुग्णालयात मोफत लस दिली जाईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times